एक पक्षी तहानला होता_मराठी गझल सतिशसिंह मालवे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक पक्षी तहानला होता_मराठी गझल सतिशसिंह मालवे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एक पक्षी तहानला होता_मराठी गझल सतिशसिंह मालवे

 एक पक्षी तहानला होता_मराठी गझल सतिशसिंह मालवे

गुलाबीगझल

...

एक पक्षी  तहानला  होता

मेघ  पाहून  हासला  होता

भाकरी चोरल्या म्हणे त्याने

तो कदाचित भुकेजला होता

झोपडी पाहिल्यावरी माझी

एक  वाडा  दुखावला होता

भेट झाली पुन्हा तुझी माझी

योग  बहुतेक  चांगला होता

पाय  होते   धरेवरी  त्याचे

हात  गगनास टेकला होता

मन लगोलग कुठे कमळ बनले

देह  चिखलात  ठेवला  होता

हेच कारण फुले मिळवण्याचे

हात  काट्यात  टाकला होता

- सतिश गु.मालवे(मुऱ्हादेवी)