येऊन तू फसलास या जन्मास आयुष्या_मराठी गझल सतीश गुलाबसिंह मालवे_गुलाबीगझल
'आयुष्या'
येऊन तू फसलास या जन्मास आयुष्या
भोगायचा आहे तुला वनवास आयुष्या
फसवेगिरी मी जीवनासोबत करू शकतो
ठेऊ नको माझ्यावरी विश्वास आयुष्या
कैद्याप्रमाणे काढतो आहे दिवस इथले
जीवन तसेही एक कारावास आयुष्या
संदर्भ दुःखाचे कुणी मागू नये मजला
माझा लिखित नाही कुठे इतिहास आयुष्या
जो जन्मला त्याचे मरण सुद्धा अटळ आहे
आले न कोणीही अमर होण्यास आयुष्या