जसा रागलोभास त्यागून आलो_मराठी गझल_सतीश मालवे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जसा रागलोभास त्यागून आलो_मराठी गझल_सतीश मालवे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जसा रागलोभास त्यागून आलो_मराठी गझल_सतीश मालवे मुऱ्हा देवी_satish malve गुलाबीगझल

जसा रागलोभास त्यागून आलो_मराठी गझल_सतीश मालवे मुऱ्हा देवी_satish malve गुलाबीगझल

जसा रागलोभास त्यागून आलो तसा बुद्ध साक्षात पाहून आलो_ मराठी गझल_सतीश मालवे-गुलाबीगझल

जसा रागलोभास त्यागून आलो

तसा बुद्ध साक्षात पाहून आलो

निरागस मुलांना हसवतो कशाने

विधात्याकडे हे विचारून आलो

बहाणा नको आज शोधूस मित्रा

तुझी भेट घेण्या स्वतःहून आलो

मला ओळखीचा न आवाज आला

उगा कान भिंतीस लावून आलो

कशी झोप येईल माझ्या जिवाला

उपाशी पिले आज निजवून आलो

जसे  रान  सुकले  तुझ्या अंतरीचे

फुलवण्यास त्याला नभातून आलो

किनाऱ्यावरी पापण्यांच्या  निघाले

जरी  दुःख  डोहात बुडवून आलो

- सतिश मालवे मुऱ्हादेवी, अमरावती

Satishgmalve@gmail.com