रडवून घेतले हसवून घेतले/Satish malve Marathi gazal

 रडवून घेतले हसवून घेतले/Satish malve Marathi gazal 

गुलाबीगझल



रडवून घेतले.......हसवून घेतले

मी जन्मभर मला समजून घेतले


कोठेतरी विसावा घ्यायला हवा

मी  यामुळे  'इथे' थांबून  घेतले


देऊन सावली मी  लेकरा तुला

आयुष्यभर शिरावर ऊन घेतले


काट्यातही सुखी जगशील माणसा 

शिक्षण कधी फुलांपासून घेतले


वैशिष्ट्य या गझलचे एवढेच की

सगळे खयाल जगण्यातून घेतले


दुःखास मी अगोदर धूळ चारली 

मग  वेदने तुला जिंकून  घेतले


घेशील तू.....भरारी अंबरामधे

पक्षी स्वतःस जर मानून घेतले



- सतिश गुलाबसिंह मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!