पुढे जायला जो तो घाई करतो आहे/satishgmalve मराठी गझल
पुढे जायला जो तो घाई करतो आहे
काळासोबत हातापायी करतो आहे
काय बिनसले तुझ्याबरोबर इतके माझे
मला पाहुनी वरती बाही करतो आहे
आयुष्याचा कोरा कागद रंगवायला
मी रक्ताची माझ्या शाई करतो आहे
प्रेमानेही वाद मिटवता येतो मित्रा
उगा कशाला मारामारी करतो आहे
तिने मनाचा रूळ पसरला माझ्यासाठी
मी श्वासाची रेल्वेगाडी करतो आहे
- सतिशसिंह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!