सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर_मराठी गझल सतीश मालवे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर_मराठी गझल सतीश मालवे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर_मराठी गझल सतीश मालवे_

 सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर_मराठी गझल सतीश मालवे_

सतिश मालवे मराठी गझल-गुलाबीगझल

सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर

तिमिरामधुनी  प्रकाशाकडे वाटचाल कर

स्वतःहून 'ती' भेट घ्यायला  आली आहे

(मनास आता सागराप्रमाणे विशाल कर)

गिनीजबुकही  नोंद आपली  घेईल उद्या

फक्त  एकदा  जगावेगळी तू कमाल कर

पुन्हा जन्म जर  असेल देवा  प्रेमासाठी

"तिला सोहनी कर आणि मला माहिवाल कर"

जागोजागी तुझ्या जीवना दिल्या परीक्षा 

आता माझ्या आयुष्याचा तू निकाल कर

- सतीश मालवे(मुऱ्हादेवी)

अमरावती