गझल- हा देह जीवनाच्या चिखलात माखला

हा देह जीवनाच्या चिखलात माखला
कमळा तुझ्याप्रमाणे जगणे शिकव मला

आधी असंख्य काटे तुडवून काढले
नंतर मला फुलांचा सहवास लाभला

बहुतेक यामुळे तो बिनधास्त वागला
त्याने अती तुझ्यावर विश्वास टाकला

माझ्यापुढे व्यथांनी नखरा करू नये
दुःखात हासण्याची शिकलोय मी कला

छळणार काय आम्हा अंधार कोणता
या काळजात आम्ही जर सूर्य पाळला

- सतिशसिंह मालवे, मुऱ्हा देवी
मो. ९५२७९१२६२५

३ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!