बोलला एक माणूस माझ्यातला_marathi gazal satish malve

बोलला एक माणूस माझ्यातला_marathi gazal satish malve


गुलाबीगझल




बोलला एक माणूस माझ्यातला
चांगला एक माणूस माझ्यातला

एवढीही नको यार चिडचिड करू
त्रासला एक माणूस माझ्यातला

फक्त चिंध्या मनाच्या नको व्हायला
फाटला एक माणूस माझ्यातला

शांततेला तुझ्या आग लावेल तो
पेटला एक माणूस माझ्यातला

प्राणघातक तिचे वार झेलूनही
वाचला एक माणूस माझ्यातला

काय दुनिये तुझी दाट गर्दी म्हणू
ओढला एक माणूस माझ्यातला

- सतिश मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!