गझल - चाललो होतो सुदामाच्या घरी


चाललो होतो सुदामाच्या घरी
त्याच रस्त्यावर मला दिसला हरी

जन्मभर कोलाहलातच राहिलो
शांतता लाभो मला आतातरी

गावचा पिंपळ स्मरत असतो मला
राहतो आहे....पुण्यामध्ये जरी

ठेव हळदीची पुडी सोबत तुझ्या
खोल जखमांची ठणक नसते बरी

मी व्यथेचे बोट धरुनी चाललो
वेदनेच्या नेहमी रस्त्यावरी


- सतिशसिंह मालवे, मुऱ्हा देवी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!