गझल- आपण कशात चुकतो जेव्हा कळेल त्याला

आपण कशात चुकतो जेव्हा कळेल त्याला
गुंता सहज प्रकारे तेव्हा सुटेल त्याला

वादळ मला सलामी ठोकून दूर जाते..
बहुतेक वेग माझा झेपत नसेल त्याला!!

पोथीपुराण खोटे तू सांगतोस कुठवर?
केव्हातरी ख-याचे दर्शन घडेल त्याला

पाऊस हाल करतो, दुष्काळ जीव घेतो
सांगा व्यथा बळीची केव्हा कळेल त्याला?

विणले जरी सुखाला फाटत अजून जाते
सांगा कशी शिलाई आता बसेल त्याला

आयुष्य स्वस्त आहे ज्याची भविष्यवाणी
जगणे महाग झाले, इतके म्हणेल त्याला

- सतिशसिंह मालवे
मुऱ्हा देवी(अमरावती)
९५२७९१२६२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!