दारावरती ठकठक झाली आहे_बहुतेक तिची चिठ्ठी आली आहे_ मराठी गझल सतिश गु.मालवे
दारावरती ठकठक झाली आहे
बहुतेक तिची चिठ्ठी आली आहे
प्रत्येकाला तो हुंगवतो माती
काळ केवढा शक्तीशाली आहे
ऊन यामुळे लागत नाही त्याला
तो आईच्या पदराखाली आहे
सुवर्णाक्षरे मला बोलली मित्रा
इतिहास तुझा गौरवशाली आहे
जरी विहरतो हवेत आम्हीही
जमीन अमुच्या पायाखाली आहे

काळ....👍
उत्तर द्याहटवा