समजून मी अगोदर हा वर्तमान घेतो_मराठी गझल सतीश गुलाबसिंह मालवे

 

समजून मी अगोदर हा वर्तमान घेतो_मराठी गझल सतीश गुलाबसिंह मालवे

गुलाबीगझल


समजून मी अगोदर हा वर्तमान घेतो

नंतर तुझे भविष्या संपूर्ण ज्ञान घेतो


गीता न बायबल ना कुठले कुराण घेतो

हातात भारताचे...मी संविधान घेतो


येतो मला ढगांवर संताप फार देवा

जाणून या धरेची जेव्हा तहान घेतो


भेटावयास मजला तू टाळतेस जेव्हा

चाळून मी स्मृतींचे एकेक पान घेतो


आवाज या विजांचे मी ऐकणार नक्की

सोसून सर्व इथले आधी तुफान घेतो


हृदयामधे व्यथेचे जन्मास बेट आले

ठेवून नाव त्याचे  मी अंदमान घेतो


गेली अनेक वर्षे भाडेकरू तुझा मी

बांधून मालकीचे आता मकान घेतो


- सतिश गुलाबसिंह मालवे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!