मोकळा केला तुझा मी पिंजरा आता
घे भरारी तू नव्याने पाखरा आता
मायभूमीची कुणाला ओढ नसल्याने
प्राण तळमळतो कुणाचा सागरा आता
मी भटकलो फक्त अंधारामुळे येथे
एकदाचा दाव रस्ता भास्करा आता
पाहुणे आले घरी बघण्यास पोरीला
जोडला जाईल नवखा सोयरा आता
मी जरीही पायथ्याशी राहतो आहे
मी चढू शकतो तुझ्यावर डोंगरा आता
- सतिशसिंह मालवे
Wow aprtim
उत्तर द्याहटवा