गझल - ठोस कोणाला पुरावा भेटला त्यावर

         
ठोस कोणाला पुरावा...भेटला त्यावर
आमच्यावर फालतूचे फोडता खापर


भूतकाळातील गोष्टी ठेव बाजूला...
स्वागतासाठी उद्याच्या व्हायचे सादर


सारखी दिसते निराशा चेहऱ्यावरती
स्वाभिमानाला कुणाच्या घाव झाल्यावर


नेमका सत्कार त्यांनी कोणता केला?
काळजापासून नव्हता त्यामधे आदर


पाप करण्याचा निराळा छंद हा माझा
मी फुलांचा जीव घेउन बनवितो अत्तर


सौख्य दुःखाचा बहर हाताळता येतो
माणसाला जीवनाचे तंत्र कळल्यावर


_________©सतिशसिंह मालवे
                  मुऱ्हा देवी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!