ती म्हणाली तेच घडले आमचे
आखलेले डाव फसले आमचे
वेदने आम्ही ठिगळ लावू तुला
काळजाचे घाव भरले आमचे
शस्त्र होते की,नजर होती तिची..
कैक योद्धे...गार पडले आमचे
टोचले काटे मनामध्ये किती?
या व्यथेने पुष्प सुकले आमचे
भेटली असती सुखाची सावली
पण उन्हाने ध्येय खचले आमचे
चार खांद्याची गरज पडली कुठे
'धड' कुरुक्षेत्रात सडले आमचे
दूर व्हा आम्हा जवळ थांबू नका!
हेच तर ऐकून चुकले आमचे
- सतिशसिंह मालवे
मु-हा देवी
अप्रतिम
उत्तर द्याहटवा