होणार स्वस्त नाही साखर तुझ्या मनाने_मराठी गझल_सतीश मालवे_गुलाबीगझल_honar swast nahi sakhar tuzya manane_marathi gazal_satish malve

होणार स्वस्त नाही साखर तुझ्या मनाने
गुणधर्म कारल्याचा जाणून घेतल्याने

अंधार दूर होतो सूर्या तुझ्यामुळे..पण!
माझी पहाट झाली पाटी नि पुस्तकाने

सुरवात तर करावी लागेल श्री गणेशा
फुंकून शंख झाला युद्धात आपल्याने

खोटे असून त्यांनी वर्चस्व प्राप्त केले
सांगा विकास त्यांचा होणार का अशाने

परिचय भल्याभल्यांना माझा सखोल होता
ओळख खरी मिळाली ध्येयास गाठल्याने

- सतिशसिंह मालवे ( मुऱ्हा देवी )

२ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!