माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही_समजू नका तरीही मी कास्तकार नाही_मराठी गझलsatishgmalve

 माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही_समजू नका तरीही मी कास्तकार नाही_मराठी गझल satishgumalve

गझलकार सतीश गुलाबसिंह मालवे गुलाबीगझल


माझ्याकडे भलेही  माझे  शिवार नाही

समजू नका तरीही मी कास्तकार नाही


विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला

मी संकुचित कधीही केला विचार नाही


येईल का दऱ्यांचा अंदाज आपल्याला

या जीवनात आला जर चढउतार नाही


वाढीव  वेतनाची  आशा  मनात  आहे

होतील  पूर्ण  गरजा इतका पगार नाही


आयुष्य पूर्ण माझे   यानेच खर्च झाले

व्यवहार जीवनाशी  केला उधार नाही


पक्षी  बनून  इच्छा  घेते  गगन  भरारी

(घरट्यात काळजाच्या बहुधा बहार नाही)


"मी थांबवू कशाला ही वाटचाल माझी"

हे कालचक्र  देवा  जर थांबणार नाही


-  सतिश गुलाबसिंह मालवे

मुऱ्हादेवी, अमरावती
मो.9527912625

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!