कसा मनाला ठेऊ प्रांजळ_मराठी गझल सतिश गुलाबसिंह मालवे

 कसा मनाला ठेऊ प्रांजळ_मराठी गझल सतिश गुलाबसिंह मालवे

गुलाबीगझल


कसा मनाला ठेऊ प्रांजळ

मतभेदाने  होते  मळमळ


विशेष काही घडले नव्हते

तरी उडाली इतकी खळबळ


तिने खोचला 'पदर' असा की!

क्षणात मागे फिरले वादळ


किती राबलो जन्मभर इथे

रिती शेवटी गेली ओंजळ


दुःखापेक्षा काळे आहे

तुझे कलंका विषाक्त काजळ


एक कल्पना सुचते आधी

बाकीची वैचारिक चळवळ


झाडे लावुन माझ्यासाठी

बाप सोसतो सूर्याची झळ


- सतिश गु मालवे

मु-हा देवी

9527912625

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!