आरशामध्ये स्वतःला पाहताना लाजली_मराठी गझल सतिश मालवे
आरशामध्ये स्वतःला पाहताना लाजली
मी तिच्या गालावरी कसली निशाणी ठेवली?
वेगळा मृत्यू कशाला मागतो देवास तू
रोजची मरमर तुझ्या तर जीवनाला लागली
एवढ्यासाठी उभे आयुष्य गझलेला दिले
वाहिली जाईल शेरांनी मला श्रद्धांजली
अन्नधान्याचा घरी दुष्काळ पडल्याने गड्या
रात्रभर कानामधे वाजत असावी ताटली
काय कौलारू असावे घर मनाचे आपल्या?
पापण्यांच्या छप्पराला फार गळती लागली
- सतिश गु.मालवे,मुऱ्हादेवी
अमरावती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!