नाही दिसत कुठेही शोधून पाखरू_मराठी गझल_सतिश_मालवे_satishmalve

नाही दिसत कुठेही शोधून पाखरू_मराठी गझल_सतिश_मालवे_satishmalve

गुलाबीगझल


नाही दिसत कुठेही  शोधून पाखरू

बसले कुठे असावे  जाऊन पाखरू


वाटत असेल त्याला परदेश चांगला

गेले स्वदेश म्हणुनी सोडून पाखरू


ओसाड काळजाचे जंगल पडायचे

जर लावले मनाचे हुसकून पाखरू


यानेच तू  उपाशी  मरतोस  पारध्या

भावूक  होत  जातो  पाहून  पाखरू


आली तुझ्याबरोबर खेळायला मुले

दे  मस्त  कागदाचे  बनवून पाखरू


- सतिश गु मालवे

मुऱ्हादेवी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!