कोणत्या बागेतली आहेस तू_मराठी गझल satishgmalve

गुलाबीगझल

कोणत्या बागेतली आहेस तू_मराठी गझल satishgmalve



कोणत्या  बागेतली आहेस तू

केवढी  गंधाळली  आहेस तू


शांतता रक्तात असताना तुझ्या

का अशी रागावली आहेस तू?


पाखराचा नेमका खोपा जिथे

तीच फांदी  छाटली आहेस तू


विठ्ठलाची काय माफी मागतो

वीट कोठे  चोरली  आहेस  तू


वाटते काट्यातुनी आली जशी

एवढी  रक्ताळली  आहेस  तू


त्याग माझा तू करू नाही शकत

काय  माझी  सावली आहेस तू?


सभ्यतेबाहेर  जाऊ  मी  कसा

संयमाने  वागली  आहेस  तू


- सतिश मालवे, मुऱ्हादेवी

अमरावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!