गझलपुष्प कला साहित्य सांस्कृतिक संस्था आयोजित रविवार दिनांक २७/०४/२०२५ रोजी कॅप्टन कदम सभागृह निगडी येथे गझलपुष्प जीवनगौरव पुरस्कार आणि गझल मंथन प्रकाशन संस्था प्रकाशित माझा एक पक्षी मराठी गझलसंग्रहाचे मराठीचे सुप्रसिद्ध जेष्ठ गझलकार श्री. प्रफुल्ल कुलकर्णी सर यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले ही माझ्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे.तसेच या प्रसंगी सुप्रसिद्ध गझलकार डॉ राजदादा रणधीर माझ्या एक पक्षी संग्रहावर मौलिक असे भाष्य करून रसिकांना माझ्या संग्रहाची विशेषता समजून सांगितली. या सोहळ्यात गझलपुष्प संस्थेकडून मराठी गझलेतल्या पहिल्या महिला गझलकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेष्ठ गझलकारा आदरणीय संगीता माई जोशी यांना गझलपुष्प जीवनगौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उद्योजक श्री. सुनीलजी कराळे सर अभयजी पोकर्णा सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र कांकरिया सर यांनी आपले विचार व्यक्त केले. अतिशय दर्जेदार अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिनेश भोसले सर यांनी करून रसिकांना त्यांच्या निवेदनातून मोहनी घातली. तसेच माननीय श्री. प्रफुल्ल कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली गझलपुष्प चे अध्यक्ष श्री. संदीप जाधव सर , प्रशांत पोरे सर अभिदादा काळे, संजयजी खोत, प्रदीपजी तळेकर सर गणेश भुते सर, निलेश शेंबेकर यांनी आपल्या बहारदार गझला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. माझा संग्रह प्रकाशित होत आहे म्हणून माझे मित्रमंडळ , सगे सोयरे समाजबांधव यांनी आवर्जून या सोहळ्याला येऊन माझ्या आनंदात कमालीची भर घालून मला जो आनंद दिला तो शब्दांत व्यक्त होणारा नाही त्याचे आभार कसे मानावे हेच समजत नाही. माझ्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम करणारे श्री अतुल देशपांडे सर, रेखाताई कुलकर्णी, रेखा ताई येळंबकर, शिलाताई टाकळकर,मीनाताई शिंदे अन्वी ताई आठलेकर आ.अनिल आठलेकर सर , हेमंत जोशी सर माझे परम मित्र श्री संतोष दारोकार त्यांच्या मित्रांसह आलेत तसेच मित्रवर्य विकास घुगे , माझे मामा श्री अरुण सोळंके मामे भाऊ श्री प्रफुल्ल सोळंके साहेब श्री. रामेश्वरभाऊ पवार , आ.श्री. विजयसिंह सोळंके साहेब , श्री. अनिल सोळंके साहेब , श्री. देवेंद्र सुसतकार साहेब ,श्री.शांताराम सोळंके साहेब, श्री. रामदास सोळंके साहेब तसेच कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. काही कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नसले तरी ते मनापासून हजर होतेच ते म्हणजे ज्यांनी माझा गझल संग्रह रसिकांच्या पुढे आणला ते गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव श्री जयवंत वानखेडे सर, तसेच गझल मंथन ची सपूर्ण टीम आणि माझे गझल गुरू डॉ. शिवाजीभाऊ काळे , डॉ स्नेहलताई कुलकर्णी, आणि मी ज्यांना माझे प्रेरणास्थान मानतो ते म्हणजे श्री निलेशभाऊ कवडे तसेच माझ्या पुस्तकाला शुभेच्छा देणारे श्री. अनंतजी ढवळे सर माझ्या संग्रहाला मुखपृष्ठ देणारे श्री संतोष घोंगडे सर यांचेही मी आभार मानतो माझ्याकडून इथे बरेच नावे घेण्याचे राहून गेलेत याची मला कल्पना आहे त्याबद्दल क्षमा मागतो. आपण आलात म्हणूनच हा सोहळा यशस्वी झाला आणि माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार. तसेच माझा परिवार माझी पत्नी सौ.भाग्यश्री आणि माझी मुलगी आराध्या आणि मुलगा कार्तिक यांना विसरून चालणार नाही. धन्यवाद. – सतिश गुलाबसिंह मालवे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!