मोकळा केला तुझा मी पिंजरा आता
घे भरारी तू नव्याने पाखरा आता
मायभूमीची कुणाला ओढ नसल्याने
प्राण तळमळतो कुणाचा सागरा आता
मी भटकलो फक्त अंधारामुळे येथे
एकदाचा दाव रस्ता भास्करा आता
मी जरीही पायथ्याशी राहतो आहे
मी चढू शकतो तुझ्यावर डोंगरा आता
राहिली ना काळजाला ओल कोणाच्या
आटला इथल्या मनांमधला झरा आता
तू कुठे इतिहास लिहिला वेगळा येथे
(की तुझ्या स्मरणार्थ बांधू चौथरा आता)
- सतिशसिंह मालवे
वाह व्वा अप्रतिम गझल आशयपूर्ण..👌👌👌प्रचंड आवडली
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार
हटवा