गझल- मोकळा केला तुझा मी पिंजरा आता


मोकळा केला तुझा मी पिंजरा आता
घे भरारी  तू  नव्याने  पाखरा  आता

मायभूमीची  कुणाला  ओढ नसल्याने
प्राण तळमळतो कुणाचा सागरा आता

मी  भटकलो  फक्त  अंधारामुळे येथे
एकदाचा  दाव  रस्ता भास्करा आता

मी  जरीही  पायथ्याशी  राहतो  आहे
मी चढू शकतो तुझ्यावर डोंगरा आता

राहिली ना काळजाला ओल कोणाच्या
आटला इथल्या मनांमधला झरा आता

तू  कुठे  इतिहास लिहिला वेगळा येथे
(की तुझ्या स्मरणार्थ बांधू चौथरा आता)

- सतिशसिंह मालवे

२ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!