मराठी गझल_दिवसरात्र हल्ली विचारात असतो_गुलाबीगझल_सतिशसिंह मालवे

मराठी गझल_दिवसरात्र हल्ली विचारात असतो_गुलाबीगझल_सतिशसिंह मालवे


Marathi gazal_gulabigazal_satishmalve_


   

दिवसरात्र हल्ली विचारात असतो

अनोख्याच एका प्रवासात असतो


किती आर्ततेने मला ती म्हणाली

तुझ्यासारखा फक्त स्वप्नात असतो


मला चेह-याने भुरळ घातली ज्या..

अता चेहरा तोच स्मरणात असतो


कधी या ठिकाणी कधी त्या ठिकाणी

मनाच्या गतीने कवी जात असतो


कुणाचे समर्थन करू सांग आता

कुठे मी कुणाच्या विरोधात असतो


नदीचे उगमस्थान शोधू कशाला?

तिच्या आसवांच्या प्रवाहात असतो 


-सतिशसिंह मालवे(मुऱ्हा देवी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!