मी विधा जशी केली आत्मसात गझलेची_मराठी गझल_सतिशसिंह मालवे

 मी विधा जशी केली आत्मसात गझलेची_मराठी गझल_सतिशसिंह मालवे


मी विधा जशी केली आत्मसात गझलेची_मराठी गझल_सतिशसिंह मालवे



मी विधा जशी केली आत्मसात गझलेची

जीवनामधे आली  चांदरात  गझलेची


वेदने तुझे नखरे काढण्यास आता मी

घेतली मदत आहे  जीवनात गझलेची


नेहमी  दरवळावा  जर सुगंध शब्दांचा

माळली फुले जावी लेखनात गझलेची


सोबती  जरी माझ्या  राहतोस अंधारा

तेवते  मनामध्ये   प्राणवात  गझलेची


चिंबचिंब होताना पाहिले तिला जेव्हा

ओळही मला सुचली पावसात गझलेची


आंधळा जरी असलो मी इथे जगासाठी

लाभली मला दृष्टी जन्मजात गझलेची


जीवनास माझ्या या अर्थ भेटतो आहे

रात्र रात्र  जाताना  चिंतनात गझलेची


जीवना तुझे सगळे काफिये निभवताना

ठेवली अलामत मी अंतरात गझलेची


---- सतिशसिंह मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!