Marathi gazal_ जरा होणार तुमच्या त्रास खांद्याना_गुलाबीगझल

गुलाबीगझल_gulabigazal_सतिशसिंह मालवे Marathi gazal_जरा होणार तुमच्या त्रास खांद्याना_गुलाबीगझल


Marathi gazal_जरा होणार तुमच्या त्रास खांद्याना

गुलाबीगझल_ गुलाबासारखी नाजूक आहे ती

जरा होणार तुमच्या त्रास खांद्यांना
मला सरणावरी घेऊन जाताना

कशाला काळजी करतोस वेडया तू
तुझ्या मागेपुढे कोणीच नसताना...

"भविष्याची नको चिंता करुस इतकी"
मला सांगून गेला काळ जाताना

गुलाबासारखी नाजूक आहे ती
तिचे काट्यामधे घरदार असताना

दुधाची आठवण झाली तुझ्या आई
पुढे या वासराच्या गाय येताना

- सतिशसिंह मालवे,मुऱ्हा देवी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!