मन थोडे जरी ईश्वरा माझे मळले असते_मराठी गझल_सतिशसिंह मालवे_गुलाबीगझल

मन थोडे जरी ईश्वरा माझे मळले असते_मराठी गझल_सतिशसिंह मालवे_गुलाबीगझल

मन थोडे जरी ईश्वरा माझे मळले असते_मराठी गझल_सतिशसिंह मालवे_गुलाबीगझल


मन  थोडेसे  जरी  ईश्वरा  माझे मळले असते

स्नान  करावे  गंगेमध्ये  मला  वाटले  असते


चिठ्ठी माझी  पोहचायला  उशीर झाला नसता

जर एखादे कबुतर माझ्या मनात वसले असते


जीवनामधे वाईट स्थिती आल्यावरती कळते

कोण दूरचे कोण जवळचे कोण आपले असते


जर शंकेचा ग्रह एखादा दोघांमध्ये असता

संसाराला कधीच अमुच्या ग्रहण लागले असते


बरे जाहले तुझ्या स्मृतीला वणवा म्हटले नाही

नाहीतर या  काळजातले  रान  पेटले  असते


- सतिशसिंह मालवे मुऱ्हा देवी

अमरावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!