मी न अवलंबून दुसऱ्यांच्या जिवावर marathi gazal satish malve murkha devi gulabigazala_गुलाबीगझल_सतिशसिंह मालवे
मी न अवलंबून दुसऱ्यांच्या जिवावर
जे मिळवतो ते स्वतःच्या मनगटावर
श्वासही माझा निघाला पक्षपाती
मी कसा विश्वास ठेवू वादळावर
मुंडके झुकवून खाली पीक म्हटले
रोग पडला कास्तकारा आमच्यावर
सागरामध्ये मिळावे स्थान त्यांना
याचसाठी भांडल्या त्या संगमावर
सावलीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ म्हणतो
गर्व झाला काय सूर्याला उन्हावर?
काय झाडांची दशा झाली असावी
निर्दयी लाकूडतोड्या पाहिल्यावर
ना'गडे दुःखास दाखवता न आले
अंगभर कपडे व्यथेला घातल्यावर
- सतिशसिंह मालवे,मुऱ्हादेवी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!