ध्येय वेड्यापरी ठेवतो...जीव हातावरी ठेवतो.. मराठी गझल सतीश मालवे_गुलाबीगझल_gulabigazal_satish malve

ध्येय वेड्यापरी ठेवतो...जीव हातावरी ठेवतो.. मराठी गझल सतीश मालवे_गुलाबीगझल_gulabigazal_satish malve

ध्येय वेड्यापरी ठेवतो...जीव हातावरी ठेवतो.. मराठी गझल सतीश मालवे_गुलाबीगझल_gulabigazal_satish malve

ध्येय वेड्यापरी  ठेवतो

जीव  हातावरी  ठेवतो

सांग सत्कार करशील का

पाय  काट्यावरी ठेवतो

वेड  लागेल  राधे  तुला

मी जवळ बासरी ठेवतो

तू भलेही फसवणूक कर

मी  भरोसा...तरी ठेवतो

काय वाजेल थंडी तिला

ओठ  ओठांवरी  ठेवतो

पंढरी  सोड  तू  विठ्ठला

मी  तुला अंतरी  ठेवतो

राग होईल अनावर कसा

बर्फ  डोक्यावरी  ठेवतो

- सतिश मालवे(मुऱ्हादेवी)

अमरावती

२ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!