ध्येय वेड्यापरी ठेवतो...जीव हातावरी ठेवतो.. मराठी गझल सतीश मालवे_गुलाबीगझल_gulabigazal_satish malve
ध्येय वेड्यापरी ठेवतो
जीव हातावरी ठेवतो
सांग सत्कार करशील का
पाय काट्यावरी ठेवतो
वेड लागेल राधे तुला
मी जवळ बासरी ठेवतो
तू भलेही फसवणूक कर
मी भरोसा...तरी ठेवतो
काय वाजेल थंडी तिला
ओठ ओठांवरी ठेवतो
पंढरी सोड तू विठ्ठला
मी तुला अंतरी ठेवतो
राग होईल अनावर कसा
बर्फ डोक्यावरी ठेवतो
- सतिश मालवे(मुऱ्हादेवी)
अमरावती
काट्यावरी
उत्तर द्याहटवाबासरी
ओठावरी
खूप आवडले शेर...भाई
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌👌👌👌