तुला किंमत तुझी देणार आहे मी_मराठी गझल सतिश मालवे मुऱ्हादेवी_गुलाबीगझल_satish malve_tula kimaat tuzi denar aahe me

तुला किंमत तुझी देणार आहे मी_मराठी गझल सतिश मालवे मुऱ्हादेवी_गुलाबीगझल_satish malve_tula kimaat tuzi denar aahe me


सतिशसिंह मालवे मराठी गझल_satishgmalve



तुला किंमत तुझी देणार आहे मी

तुझ्या नाण्यातला कलदार आहे मी


कधीचे  अंबराला  सांगतो  आहे

फुटू दे पंख...मग उडणार आहे मी

 

कुठे शहरात प्रेमाचा झरा दिसला

पुन्हा गावाकडे फिरणार आहे मी


जरी कचऱ्यामधे जगणार आहे मी

तुझ्या डोळ्यांमधे खुपणार आहे मी


तुला  आश्वासनावर  ठेवतो  आहे

जरा  समजून घे सरकार आहे मी


- सतिश मालवे (मुऱ्हा देवी)

३ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!