तुला किंमत तुझी देणार आहे मी_मराठी गझल सतिश मालवे मुऱ्हादेवी_गुलाबीगझल_satish malve_tula kimaat tuzi denar aahe me
तुला किंमत तुझी देणार आहे मी
तुझ्या नाण्यातला कलदार आहे मी
कधीचे अंबराला सांगतो आहे
फुटू दे पंख...मग उडणार आहे मी
कुठे शहरात प्रेमाचा झरा दिसला
पुन्हा गावाकडे फिरणार आहे मी
जरी कचऱ्यामधे जगणार आहे मी
तुझ्या डोळ्यांमधे खुपणार आहे मी
तुला आश्वासनावर ठेवतो आहे
जरा समजून घे सरकार आहे मी
Best gajhal in my life
उत्तर द्याहटवाग्रेट जी ग्रेट
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा