सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर_मराठी गझल सतीश मालवे_

 सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर_मराठी गझल सतीश मालवे_

सतिश मालवे मराठी गझल-गुलाबीगझल





सुंदर जीवन जगण्यास अशी उलाढाल कर

तिमिरामधुनी  प्रकाशाकडे वाटचाल कर


स्वतःहून 'ती' भेट घ्यायला  आली आहे

(मनास आता सागराप्रमाणे विशाल कर)


गिनीजबुकही  नोंद आपली  घेईल उद्या

फक्त  एकदा  जगावेगळी तू कमाल कर


पुन्हा जन्म जर  असेल देवा  प्रेमासाठी

"तिला सोहनी कर आणि मला माहिवाल कर"


जागोजागी तुझ्या जीवना दिल्या परीक्षा 

आता माझ्या आयुष्याचा तू निकाल कर


- सतीश मालवे(मुऱ्हादेवी)

अमरावती

२ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!