कुसळ टोचले काय डोळ्यांमधे/मराठी गझल Satish malve

 कुसळ टोचले काय डोळ्यांमधे/मराठी गझल Satish malve 

गुलाबीगझल



कुसळ टोचले काय डोळ्यांमधे?

तुला एक दिसतात घोडे गधे


धुरंधर फलंदाज त्याला म्हणा

उतरतो खरा 'जो' कसोटीमधे


गझल पौर्णिमेसारखी जाहली

जसा  गुंफला  'चंद्र'  शेरांमधे


उभा  देह  आतून   पेटायचा 

तुझे  ओठ  घेऊन  ओठांमधे


पुढे  मार्ग  होईल सोपा तुझा

जरी  घाट सध्या  प्रवासामधे


- सतिश गुलाबसिंग मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!