जरी शहाणे असतो आपण/मराठी गझल सतिश मालवे


जरी शहाणे असतो आपण/मराठी गझल सतिश मालवे 

गुलाबीगझल



जरी शहाणे असतो आपण

वेड्यागत वावरतो आपण


जन्म एकदा होतो अपुला

क्षणाक्षणाला मरतो आपण


नजर आपली मेली आहे 

काय कत्तली बघतो आपण


 विश्व मानतो डबक्याला अन् 

त्याला सागर म्हणतो आपण


फक्त पाहतो वरची बाजू

खोलात कुठे शिरतो आपण


परिस्थितीशी युद्ध आपले 

पोटासाठी लढतो आपण


काळ कसाई बनतो तेव्हा 

त्याला बकरे दिसतो आपण


- सतिश गुलाबसिंह मालवे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!