...
आजन्म सावलीच्या शोधात राहिलो/मराठी गझल Satish Malve
आजन्म सावलीच्या शोधात राहिलो
मी यामुळे उन्हाच्या..लक्षात राहिलो
सत्कार आज माझा त्यानेच ठेवला
काटा बनून ज्याच्या हृदयात राहिलो
मागावरी शिकारी माझ्या असूनही
दाणे टिपावयाला मी जात राहिलो
मनमोकळेपणाची नाही मला मुभा
बहुतेक याचसाठी वृत्तात राहिलो
गावाकडील शेती विक्रीस काढली
बांधून राजवाडा..शहरात राहिलो
वनवास जीवनाचा भोगायचा किती ?
अख्खी हयात मी या प्रश्नात राहिलो
- Satish G. Malve

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!