त्रास व्हायला सुखी मनाला माझ्या/मराठी गजल satishgmalve

त्रास व्हायला सुखी मनाला माझ्या/मराठी गजल satishgmalve


गुलाबीगझल



त्रास व्हायला सुखी मनाला माझ्या

जखमी केले मी हृदयाला माझ्या


वास्तववादी कथा असावी त्याची

अंगावरती काटा आला माझ्या


"होतिल आता मोहित इथले सगळे"

(सुटला आहे गंध फुलाला माझ्या)


तुझा  यामुळे  विसर  पडेना देवा

दिलीस  दुःखे तू  वाट्याला माझ्या


कधी कुणाच्या कामी पडला नाही

काय अर्थ आहे पैशाला माझ्या


कोण शिखंडी बनून आला आहे

कळेल केव्हा हे भीष्माला माझ्या


आग..आग..तो करीत सुटला आहे

आग लावुनी उभ्या घराला माझ्या


- सतिश गुलाबसिंह मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!