ह्यामुळे भेगाळल्या असतील टाचा/मराठी गजल सतिश मालवे

 ह्यामुळे भेगाळल्या असतील टाचा/मराठी गजल सतिश मालवे 

गुलाबीगझल



ह्यामुळे भेगाळल्या असतील टाचा

मी तुडवल्या जन्मभर आहेत काचा


ऐतिहासिक दाखला मिळणार आहे

गाडला आहे जरी इतिहास त्याचा


वाहुनी जाईल सगळे विश्व तुमचे

बांध फुटला आमच्या जर संयमाचा


काळजामध्ये तुला जागा दिली मी

अन् मला म्हणतोस तू कोत्या मनाचा


फाटली आहे स्थिती आधीच माझी

आणि त्यातच भाव पडला कापसाचा


नीलकंठाची तुला उपमा मिळाली

प्राशला असणार तू प्याला विषाचा


- सतिश मालवे,अमरावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!