किती विजांशी आधी लढला होता/
मराठी गझल सतिश गुलाबसिंग मालवे
किती विजांशी आधी लढला होता
नंतर कोठे तो कोसळला होता
शेवाळाने तुला स्पर्शिले नाही
तुझाच वेडे पाय घसरला होता
भूमिहीन तर आता आता झालो
(एकेकाळी जमीन जुमला होता)
बाकी काही जिंकू शकला नाही
पण सर्वांचे हृदय जिंकला होता
तहानलेली मने पाहुनी अमुची
दगडांना या पाझर फुटला होता
कसा अचानक दुःखामध्ये माझ्या
सुखद मनाला धक्का बसला होता
ओझे त्याला ओझे वाटत नाही
कारण त्याने भार पेलला होता
- सतिश गुलाबसिंग मालवे
मु-हा देवी(अमरावती)
ह.मु. शिक्रापूर (पुणे)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!