हुंदका दाटून आल्यावर नभाला/मराठी गझल Satish malve
हुंदका दाटून आल्यावर नभाला
केवढा आनंद होतो चातकाला
लावुनी गेलीस तू चटका मनाला
मात्र दोषी मी ठरवले विस्तवाला
एकदा परतुन बळीचे राज्य यावे
सर्व काही दान करतो वामनाला
काय बुद्धाची दशा होईल सांगा
भेटला राहुल कधी जर गौतमाला
शेवटी झालेच माझे घर निलामी
काढले विक्रीस आता वावराला
मी किनारा गाठला असता परंतू
ऐनवेळी भोवरा मार्गात आला
जिंकलो नाही तरी चालेल आपण
पण तरीही जीव लावूया पणाला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!