नदीची धार दिसल्यावर करू शकतो_marathi gazhal by satish Malve
नदीची धार दिसल्यावर करू शकतो
तिचाही मी महासागर करू शकतो
स्वतःला मानल्यावरती सिकंदर मी
हुकूमत पूर्ण विश्वावर करू शकतो
मला दिंडीत जाणे शक्य नाही.. पण
भजन कीर्तन विठोबावर करू शकतो
निराशेच्या ढगांनी व्यापल्यानंतर
व्यथांचे वेगळे अंबर करू शकतो
करू शकतो करू शकतो करू शकतो
मनामध्ये तुझ्या मी घर करू शकतो
तुला विश्वास नाही राहिला माझा
भरोसा कोण माझ्यावर करू शकतो
– सतीश गुलाबसिंह मालवे

वाह.. खूप सुंदर गझल सतीश दादा 👌👌👌👌💐🌹💐🌹
उत्तर द्याहटवा