Ek Pakshi Marathi gazal sangrah – Satish Malve एक पक्षी मराठी गझलसंग्रह – सतिश मालवे
🌿 "एक पक्षी" – पहिली आवृत्ती संपल्याचा आनंदक्षण 🌿
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे माझा पहिला मराठी गझलसंग्रह "एक पक्षी" याची पहिली आवृत्ती संपली आहे.
माझ्यासारख्या छोट्या गझलकाराला एवढं अपरंपार प्रेम मिळेल, याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती.
हे यश तुमचं आहे — कारण प्रत्येक वाचक, प्रत्येक गझलप्रेमी आणि शुभचिंतकानेच या पक्ष्याला उंच भरारी दिली आहे.
🌿 एक पक्षी – गझल संग्रह 🌿
📖 पुस्तकाची माहिती
- लेखक: सतिश गुलाबसिंह मालवे
- मुखपृष्ठ: संतोष घोंगडे
- प्रकाशक: गझल मंथन प्रकाशन, कोरपना
- किंमत: ₹200/-
- संपर्क: 9527912625
- पुरस्कार: 🏆संग्रहाला मिळालेला पहिला पुरस्कार समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य तर्फे[समरसता साहित्य पुरस्कार २०२५]
🕊 संग्रहाच्या शीर्षक गझलेतील दोन शेर
गावाकडून आला शहरात एक पक्षी
पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी
घेण्यास तो भरारी बाहेर येत असतो
पाळून ठेवला मी हृदयात एक पक्षी
📜 या संग्रहातील मान्यवरांच्या मनोगतातून
१. डॉ. शिवाजी काळे (राशीन, कर्जत )
सतीशजींची गझल मातीची माया, घामाचा सुगंध, आणि निरागस मनाची सच्चाई घेऊन येते...
२. श्री.निलेश कवडे (अकोला)
सुचलेले मांडण्याऐवजी सोसलेले मांडण्याच्या भूमिकेमुळे सतीश मालवे यांची गझल आपसूकच वैशिष्ट्यपूर्ण ठरते...
३. श्री. अनंत ढवळे (अमेरिका)
गझलेचा शेर सांगण्याचं / लिहिण्याचं काही एक कौशल्य आहे - त्यात विषयाची मांडणी, शब्दाची निवड ह्या खेरीज इतरही अनेक गोष्टी आहेत. शेर क्वचित प्रतिमानांमधून बोलतो तर कधी थेट बखानातून. सतिश मालवे ह्यांना शेरांची ही कला साधली आहे असे म्हणता येते.
४. डॉ. स्नेहल कुलकर्णी
लिखाणातून सामाजिक प्रश्नांचा, दुःखांचा केवळ उदो उदो न करता, चिंतनशील पातळीवर जाऊन अपार मानवी करुणेने त्यांचा वेध घेण्याची धडपड सतीशजींच्या लेखणीतून उजागर होताना दिसते
🙏 मनःपूर्वक आभार तुमच्यापुढे 🙏
खूप खूप अभिनंदन दादा 💐💐💐
उत्तर द्याहटवाया एक पक्षाच्या गरूड भरारी साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
असेच दर्जेदार अनेक पुरस्कार मिळत राहोत.
मनापासून धन्यवाद ताई
हटवा