पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना_मराठी गझल सतीश मालवे_गुलाबीगझल_satish Malve

 पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना_मराठी गझल सतीश मालवे_गुलाबीगझल_satish Malve


पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना

-
               "वेदना"

पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना
वाटू  कशा  तुम्हाला फुकटात वेदना

दिसतो वरून अवघा मी कोरडा जरी
आतून  ओल  मजला  देतात  वेदना

बहुतेक  घाव  झाले असतील देखणे
लाजून  फार  माझ्या  गेल्यात वेदना

विश्वास तोडल्यावर  देऊ  नका  फुले
काट्यासमान  हृदयी  सलतात वेदना

पाहून  पुस्तकांवर  ही  धूळ  कालची
बहुतेक   दप्तराला  झाल्यात  वेदना

- सतिशमालवे(मुऱ्हादेवी)

५ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!