कोण होता कोण नाही देव जाणे_मराठी गझल satishgmalve

कोण होता कोण नाही देव जाणे_मराठी गझल satishgmalve

कोण होता कोण नाही देव जाणे_मराठी गझल satishgmalve



कोण होता कोण नाही देव जाणे

तो दिसत होता मला, साईप्रमाणे


लेकरागत मी तिला बिलगून बसतो

वाटते  हल्ली  गझल  आईप्रमाणे


राहतो  गावात  छोट्याश्या जरीही

फार  मोठे  आमचे  आहे  घराणे


तू  सुदामासारखा  आहेस  मित्रा

भेटतो  मीही  तुला  कृष्णाप्रमाणे


"मी तिला अख्खी मकरसंक्रात देउन"

फक्त मोबदल्यात मागितले उखाणे


खूप  आनंदात  जगला आजवरती

चल  अता  थोडे  जगू कंटाळवाणे


स्वर्गवासी  जाहलो  तेव्हा  कळाले

शेवटी  आयुष्य  हे केवळ खकाणे


मी कुणाच्या ढोलकीवर काय नाचू

चाललो  मी  जीवनाचे  गात गाणे


- सतिश गु.मालवे(मुऱ्हादेवी

अमरावती


४ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!