कोण होता कोण नाही देव जाणे_मराठी गझल satishgmalve
कोण होता कोण नाही देव जाणे
तो दिसत होता मला, साईप्रमाणे
लेकरागत मी तिला बिलगून बसतो
वाटते हल्ली गझल आईप्रमाणे
राहतो गावात छोट्याश्या जरीही
फार मोठे आमचे आहे घराणे
तू सुदामासारखा आहेस मित्रा
भेटतो मीही तुला कृष्णाप्रमाणे
"मी तिला अख्खी मकरसंक्रात देउन"
फक्त मोबदल्यात मागितले उखाणे
खूप आनंदात जगला आजवरती
चल अता थोडे जगू कंटाळवाणे
स्वर्गवासी जाहलो तेव्हा कळाले
शेवटी आयुष्य हे केवळ खकाणे
मी कुणाच्या ढोलकीवर काय नाचू
चाललो मी जीवनाचे गात गाणे
- सतिश गु.मालवे(मुऱ्हादेवी
अमरावती
मतला
उत्तर द्याहटवाघराणे
आई
गाणे
चांगले शेर....एकंदर गझल छान झाली..
मनःपूर्वक धन्यवाद मित्रवर्य
उत्तर द्याहटवाGret
उत्तर द्याहटवावाह
उत्तर द्याहटवा