वाट्यास गंध आला जर जीवनाबरोबर_मराठी गझल सतीश गुलाबसिंह मालवे
वाट्यास गंध आला जर जीवनाबरोबर
येते प्रचंड दडपण बागेतल्या फुलांवर
दुःखे गिळायला तो बाहेर येत असतो
पाळून ठेवला मी हृदयात एक अजगर
अस्तित्व सागराचे टिकणे कठीण आहे
माझ्यातला अगस्ती,केव्हा तहानला तर
डोक्यामधे कुणाला ठेऊ नको निरंतर
दिसतात चेहरे मग स्वप्नामधे भयंकर
धास्तावल्या मनाची समजूत घाल माझ्या
भटक्या विमुक्त जाती भेटायच्या अगोदर
हट्टामुळे मुलाच्या दुसरा विवाह केला
सावत्र त्यास समजुन देऊ नकोस अंतर
- सतिश गुलाबसिंह मालवे(मुऱ्हादेवी)
वाह सतिश भाऊ. गझल खूप खूप आवडली.
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद भाई
हटवाखूप सुंदर.. वाह
उत्तर द्याहटवावाह! खूप सुंदर
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद
हटवाशोभा वागळे
उत्तर द्याहटवावाह!खूप सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद
हटवाअप्रतिम गझल
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद सर
हटवा